राजे समरजीत घाटगे यांनी थेट शिवानी च्या घरी जाऊन तिचे अभिनंदन करत तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी

#प्रचंड_इच्छाशक्ती_व_आत्मविश्वास_बाळगत_तुझे_ध्येय_प्राप्त_कर.!* ..*अशी पाठ थोपाटत पाठबळ दिलंय #मा_राजे_समरजितसिंह_घाटगे यांनी....

बिद्री येथील शिवानी बजरंग वड्ड हिने आर्थिक परिस्थितीवर मात करुन दहावीच्या परीक्षेत 91.80 टक्के गुण मिळवत भरघोस यश मिळविले परंतु घरची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने तिच्या पुढील शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यासंबंधीची माहिती वर्तमानपत्रांद्वारे राजे समरजीत घाटगे यांना मिळताच त्यांनी थेट शिवानीच्या घरी जाऊन तिची भेट घेतली आणि तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली.

बिद्री साखर कारखाना साइटवर दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या श्रीमती वैशाली वड्ड यांनी पती निधनानंतर भाजी मंडईत झाडू मारणे तसेच परिसरातील घरे व हॉटेलात धुणीभांडी करून मुलांना मोठ्या कष्टाने शिकविले. याच कष्टाचे चीज करत शिवानीने कोणत्याही खाजगी शिकवणी शिवाय दहावीच्या परीक्षेत 91.80 टक्के इतके गुण मिळविले. पुढे जाऊन शिवानीला प्रशासकीय सेवेत करियर करण्याची इच्छा आहे.आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे हुशार आणि होतकरू असणाऱ्या शिवानीच्या पुढील शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यासंबंधीची माहिती मिळताच म्हाडाचे अध्यक्ष आणि शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजीत घाटगे यांनी थेट शिवानी च्या घरी जाऊन तिचे अभिनंदन करत तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. ज्याप्रमाणे राजर्षी शाहू महाराजांनी एका गरीब कुटुंबातील होतकरू असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांना स्वतः जाऊन शिक्षणासाठी मदत केली होती त्याचप्रमाणे कृती करत राजे समरजीतसिंह घाटगे यांनी आपला कृतिशील वारसा दाखवून दिला.


वाचा राजेंच्या पंढरीच्या वारीबद्दल ...

11 views0 comments